breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक चॅनलच्या ३ अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी

मुंबई – न्यूज चॅनल्समधील टीआरपी घोटाळा मुंबई पोलिसांनी उघड केल्यानंतर या प्रकरणाचा तपास जोरदार सुरु झाला आहे. या प्रकरणी काल (११ ऑक्टोबर) दिवसभर मुंबई क्राईम ब्रान्चने रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी, हर्ष भंडारी यांची मुंबईत तर दमणमध्ये डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग यांची पोलिसांनी चौकशी केली. या तिघांनाही आज चौकशीसाठी कागदपत्रांसह पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. CRPC 91 अंतर्गत नोटीस बजावली असून चॅनलला मिळालेल्या जाहिराती, त्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर महत्त्वाची कागदपत्र घेऊन चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

टीआरपी घोटाळा प्रकरणी काल पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची ८-९ तास, COO हर्ष भंडारी यांची ६ तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची ६ तास कसून चौकशी केली आहे. या तिघांनाही टीव्ही जाहिराती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोलिसांकडे जमा करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, नफा, तोटा यांसंदर्भातला सगळा डाटा रिपब्लिकला पोलिसकडे द्यावा लागणार आहे.

कालच्या चौकशीत टीव्हीवर दिसणाऱ्या कंटेंटशी आमचे देणंघेणं नसून त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, अशी माहिती विकास खानचंदानी यांनी दिली आहे. काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यामध्ये हंसा नावाच्या कंपनीचा अहवाल आहे. असं सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडेवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र हंसा कंपनीने तो अहवाल स्वतःचा नसल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. या संदर्भात वेगळी चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. आज या शो संदर्भात उत्तर देण्यास विकास खानचंदानी यांनी असमर्थता दर्शवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button