breaking-newsराष्ट्रिय

उत्तर प्रदेशमध्ये अपघातात 6 ठार, 4 जखमी

जौनपुर: ट्रकचालकाचा गाडीवरून ताबा सुटल्यामुळे जलालपूर मार्केटमध्ये अपघात झाला. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी आहेत.

हि दुर्घटना लखनऊ-वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 9.30 वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर ट्रेलर-ट्रक लोकांवर जाऊन पडला. त्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला.

अजय सिंग (40), अन्वर (51) आणि मुन्ना (30) अशी मृतदेहांची ओळख पटलेली आहे. इतर जणांची ओळख पटली नाही. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button