breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टिपू सुलतान हे वाघाप्रमाणे पराक्रमी होते – कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) –  टिपू सुलतान हे म्हैसूर संस्थानचे पराक्रमी राजे होते. पारंपारिक शिक्षण मौलवींकडून आणि गाझीखानसारख्या मुरब्बी लष्करी अधिका-यांच्या हाताखाली त्यांनी लष्करी शिक्षण घेतले. 1872 मध्ये हैदरच्या मुत्यूनंतर म्हैसुरच्या गादीवर येण्यापुर्वी अनेक लढाया जिंकण्याचा अनूभव त्यांच्या पाठीशी होता. राज्य कारभारात चोख व्यवस्था ठेवून स्वत:ची नवीन वजने, मापे पध्दती आणि नाणी त्यांनी तयार केली. तसेच, स्वत:ची कालगणना तयार करुन नवीन वर्षे व महिने यांना नावे दिली. ‘टिपू’ या कन्नड शब्दाचा अर्थ वाघ असा होतो. टिपू सुलतान देखील वाघाप्रमाणेच पराक्रमी होते, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग आणि एनएसयुआय यांच्या वतीने गतवर्षी प्रमाणे टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त खराळवाडी पिंपरी येथील उर्दू शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, सरचिटणीस मॅन्युअल डिसुझा, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲड. तारीक रिझवी, शहर निरीक्षक आदिल मोमिन, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष डॉ. वसीम इनामदार आदी उपस्थित होते. यावेळी मोफत आरोग्य शिबीरअंतर्गत सर्वांची मोफत तपासणी करण्यात आली.

साठे म्हणाले की, टिपू सुलतान यांनी त्यांच्या राज्यात महसूल व लष्करी सुधारणा केल्या. फारशी, उर्दू, कन्नडसह मराठी भाषा त्यांना अवगत होत्या. त्यांचा मराठीतील पत्रव्यवहार उपलब्ध आहे. कला कौशल्य व वाड्‌:मयाचा छंद जोपासत हस्तलिखितात कुराणाचे भाषांतर, मोगल काळातील वृत्त, तवारिखा हे साहित्य त्यांनी लिहिले आहे. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुध्द दिलेला लढा प्रेरणादायी होता. त्यांनी त्यांच्या राजवटीत कोणताही धार्मिक भेदभाव न करता अनेक हिंदू मंदिरांना संरक्षण दिले. मंदिरांच्या देवस्थान संस्थानांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणून जमिनी व जहागिरी दिल्या होत्या.

स्वागत शहाबुद्दीन शेख यांनी केले. सूत्रसंचालन तारीक रिझवी यांनी केले. आभार डॉ. वसीम इनामदार यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button