breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,83,775 वर

  • मुंबईत 908, पुण्यात 717 नवे रुग्ण

मुंबई – रविवारी दिवसभरात 5,369 नवे कोरोना रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16,83,775 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,726 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 113 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,14,079 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 44,024 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,25,109 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 908 नवे रुग्ण आढळले, तर 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,58,408 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,275 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात मुंबईत 1716 जण कोरोनामुक्त झाले, तर सध्या 18,026 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 717 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,24,294 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7,907 इतका झाला आहे. तसेच काल आढळलेल्या 717 रुग्णांपैकी 377 रुग्ण हे पुणे शहरातील असून 143 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत. त्यामुळे पुणे शहराची रुग्णसंख्या आता 1,61,711 वर पोहोचली असून पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्या 87,883 इतकी झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button