पुणे

टिंडरवर ओळख करून मित्रानेच केले दुषकृत्य, मित्राला अटक

हिंजवडी येथे मित्रानेच महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. टिंडर या मोबाईल अॅपवरून ओळख झालेल्या मित्रानेच महिलेला हिंजवडी येथील एका हॉटेलवर नेऊन जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर महिलेला घरी नेऊन मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. शनिवारी (दि. 26) दुपारी चार ते रात्री साडे अकरा या कालावधीत ही घटना घडली.

अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीर नगर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अभिजित यांची टिंडर या अॅप्लिकेशनवरून ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन अभिजित याने फिर्यादी महिलेला शनिवारी दुपारी चार वाजता हिंजवडी येथील एफ एम एल हॉटेलवर नेले. तिथे महिलेला जबरदस्तीने दारू पाजली.

त्यानंतर अभिजित याने फिर्यादी महिलेला त्याच्या घरी नेले. तसेच महिलेला लाथाबुक्क्यांनी, बुटाने व हाताने मारहाण करून डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर मारून जखमी केले. मारहाण केल्यानंतर अभिजित याने महिलेवर बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button