breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टक्केवारीसाठी सत्ताधारी-विरोधकांत हाणामारी, डोकेदुखी वाढल्याने रोड स्वीपर निविदा रद्द होणार

  • आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांकडे केली मागणी
  • स्वतः स्वीपर मशीन खरेदीची पालिकेला केली सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते सफाई यांत्रिक पध्दतीने करण्याकरता महापालिकेने रोड स्वीपर मशिन खरेदीसाठी 700 कोटींची निविदा काढली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांच्यासह सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांचा याला कडाकडून विरोध आहे. टक्केवारीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आक्षरषः हाणामारी होण्याचे चित्र आहे. ही डोकेदुखी वाढल्याने निविदाच रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील रस्त्यांची सफाई यांत्रिक पध्दतीने करण्याचा उद्देश समोर ठेऊन रोड स्वीपर मशिन खरेदी करण्यासाठी 700 कोटींची निविदा राबविली. मात्र, या निविदेत शिवसेना, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपच्या मातब्बर नेत्यांचे हात ओले होणार असल्याचा संशय वाढला आहे. टक्केवारीसाठी आयुक्तांवर देखील दबाव आणला जात होता. अनेक भाजपसह राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांनी ”माझे काय…” असा आयुक्तांना इशारावजा संकेत दिला आहे त्यावर आयुक्तांनीही संताप व्यक्त करत या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केली. शेवटी या विषयाला स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या अखेरच्या सभेत मंजुरी देण्यात येणार होती. मात्र, सभापती मडिगेरी यांच्यावर हा विषय नामंजूर करण्यासाठी शेवटपर्यंत दबाव वाढला होता. त्यामुळे पोलीस संरक्षणात ही सभा घेण्यात आली.

आम्हाला नाही तर तुम्हाला सुध्दा मिळू देणार नाही, अशा भूमिकेत येऊन काहींनी या निविदेला हाणून पाडण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. केवळ टक्केवारी मिळविण्यासाठी प्रशासन आणि भाजपच्या मातब्बरांची डोकेदुखी वाढल्याने ”तुला ना मला अण घाल कुत्र्याला” म्हणण्याची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली. या निविदेच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन केले. अनेकांनी निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे रोड स्वीपर मशिन खरेदी निविदेचा विषय महापालिका वर्तुळात चांगलाच चर्चेचा ठरला.

रोड स्वीपर मशिन खरेदीची 700 कोटींची निविदा तातडीने रद्द करण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. महापालिकेने 2020-21 साठी आवश्यक असणारी रोड स्वीपर मशिन स्वतः खरेदी कराव्यात. यासाठी अंदाजपत्रकामध्ये योग्य ती तरतूद करावी. या मशिन चालविण्यासाठी पालिकेच्या कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात यावे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचत होईल.

आमदार लक्ष्मण जगताप, भाजप

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button