breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

ज्योतिरादित्य सिंधिया गेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला,आज संध्याकाळीच भाजपात प्रवेश करणार

ज्योतिरादित्य सिंधिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत गेले आहेत. ते आज संध्याकाळीच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत जाऊन जोत्यिरादित्य सिंधिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसने यश मिळवलं खरं. मात्र कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणं हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना चांगलंच भोवलं आहे. कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी सत्ता स्थापन झाली तेव्हापासून आहे. ज्याचा फायदा आता भाजपा घेणार हे उघड आहे.

मध्यप्रदेश सरकार पाडण्यात आपल्याला काहीही रस नाही असं माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. तरीही कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातल्या मतभेदांचा फायदा हा भाजपाला होणार हे स्पष्ट आहे.

मध्यप्रदेशात भाजपाकडे १०७ जागा आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत १७ आमदार आले तर भाजपाची सत्ता मध्यप्रदेशात स्थापन होऊ शकते. आता मुख्यमंत्रीपदी ज्योतिरादित्य सिंधिया बसणार की शिवराज सिंह चौहान हे पुढच्या रणनीतीवरच ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button