breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

हिंदकेसरीची गदा महाराष्ट्राकडे; पुण्याच्या अभिजित कटकेनं पटकावला ‘हिंदकेसरी’ किताब

हरियाणाच्या सोनूवीरचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय

पुणे : भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके हा २०२३ चा हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. समस्त महाराष्ट्राचे गौरव, हवेली तालुक्याचा ढाण्यावाघ, वाघोली गावचे सुपुत्र महाराष्ट्राचा पैलवान भिजित कटके यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

भारतीय शैली कुस्ती महासंघाने दिनांक ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेची गदा पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने पटकावली आहे. तेलंगणा राज्यात सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोनूवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला आहे.

पुण्याचा कुस्तीपटू अभिजीत कटकेने हरियाणाच्या सोमवीरला आस्मान दाखवू हिंदकेसरी किताब आपल्या नावावर केला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अभिजीतने हरियाणाच्या सोमवीरवर एकदाही वरचढ होण्याची संधी दिली नाही. अभिजीतने ५-० ने मात करत हिंद केसरीच्या किताबावर आपलं नाव कोरलं.

अभिजीत कटके हा २०१७ सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता आहे. २०१७ भूगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीतने किरण भगतला पराभूत करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला होता. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. त्याच्या आजच्या विजयाने त्याच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. त्याने हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या देखील शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. अभिजीत कटके याच्या विजयानंतर पुण्यात एकच जल्लोष पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button