breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेच्या मावळ-शिरुर उमेदवारांच्या विरोधात मनसैनिक घरोघरी करणार प्रचार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भाजप-शिवसेना महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्याविरोधात मनसैनिक घरोघरी जाऊन प्रचार करणार आहेत. मोदीच्या चुकीचे धोरणे, त्यांच्यामुळे होणारा त्रास, पाच वर्षात एकही पूर्ण न केलेले आश्वासन याची माहिती देणार आहेत. पदयात्रा, दुचाकी रॅली, कॉर्नर बैठका, सभा, मेळावे घेऊन भाजप-शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे मनसेच्या नेत्यांनी सांगितले. तसेच मावळ मतदारसंघासाठी पनवेलमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे, असल्याचेही सांगितले. 
पिंपरीत आज (शनिवारी) मनसेची पत्रकार परिषद झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मावळ आणि शिरुर मतदारसंघातील मनसेची प्रचाराची रणनीती नेत्यांनी सांगितली. यावेळी शहराचे प्रभारी रणजित शिरोळे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, शहराध्यक्ष सचिन चिखले, उमहिला शहराध्यक्ष अश्विनी बांगर, पशहराध्यक्ष अंकुश तापकीर, अंकुश पटेकर, विशाल मानकरी, राजू साळवे उपस्थित होते.

आमचा कोणालाही पाठिंबा नाही. आम्ही कोणाच्याही सभेत सहभागी होत नाही. स्वतंत्रपणे  भाजप-शिवसेनेच्या विरोधात प्रचार करत आहोत असे स्पष्ट करत किशोर शिंदे म्हणाले, “मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात हाक दिली आहे. त्यानुसार आम्ही भाजप-शिवसेना महायुतीच्या विरोधात प्रचार करत आहोत. प्रचाराची यंत्रणा उभारली आहे. पुणे जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मनसैनिक कामाला लागले आहेत.  मोदी, शहा यांच्यासोबत खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे का नको आहेत ? हे मनसैनिक जनतेला समजावून सांगणार आहेत. भाजपमुळे जनतेला होत असलेला त्रास सांगणार आहेत”

शहरात दुचाकी रॅली, पदयात्रा काढणार असून कॉर्नर सभा, बैठका घेणार आहोत. शहरात प्रचाराची डिजिटल गाडी फिरणार आहे. त्याच्या माध्यमातून मोदी यांचा खोटेपणा जनतेसमोर आणणार आहोत. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना भाजपकडे उत्तर नाही. त्यामुळे मनसेला भाजपचे ‘लावारीस’ भक्त ट्रोल करत आहेत. परंतु, आम्ही त्यांना भीक घालत नसून जशाच तसे उत्तर देणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.

गणेश सातपुते म्हणाले, “मोदी आणि शहा मुक्त देश करायचा आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर न जाता आम्ही स्वतंत्र भाजप-शिवसेना महायुतीच्या विरोधात प्रचार करणार आहोत. मोदी यांच्या एकधिकारशाहीमुळे होणा-या त्रासाची जनतेला आठवण करुन देणार आहोत. स्वायत्त संस्था धोक्यात आहेत. देशातील सनदी अधिकारी निवडणूक आयोगा विरोधात राष्ट्रपतीकडे तक्रार करत आहेत. त्यामुळे भाजपची ही भूमिका आम्ही घराघरात जाऊन सांगणार आहोत. राज ठाकरे यांच्या भाजपविरोधी भूमिकेचे जनतेने स्वागत केले आहे. त्यांची भूमिका आवडली आहे. नागरिकांची त्यांच्या सभेला गर्दी होत आहे. जनता आम्हाला साथ देत आहे” असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button