breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ज्येष्ठांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबध्द – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

वर्षातील ३६५ दिवस हे ज्येष्ठ नागरिकांचेच असून ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर येथे करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या शैलजा मोरे, सुजाता पालांडे, आरती चोंधे, अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसचिव तथा सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप, समाज विकास अधिकारी संभाजी एवले तसेच महासंघाचे प्रतिनिधी व सर्व संलग्न ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वाचे आहे. ज्येष्ठांनी आपल्यातील चांगले गुण आजच्या पिढीला द्यावे. आपल्या संस्कारातूनच नवी पिढी घडणार आहे. आपल्याला दुस-यांवर अवलंबून राहिला लागणार नाही, याची ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील विविध भागात प्रबोधनात्मक केंद्रे उभी करून त्यांच्यामार्फत ज्येष्ठांनी समाजातील आजच्या तरुणांचे प्रबोधन केले पाहिजे. संवादातून न पटणारे विचारही पटतात म्हणून कोणत्याही समाजात संवाद महत्वाचा असतो. ज्येष्ठांनी देखील संवादाच्या माध्यमातून आपले विचार नागरिकांना पटवून द्यावेत, असेही ते म्हणाले.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ज्येष्ठांची स्वतंत्र धोरण राबविणारी पिंपरी चिंचवड महापालिका पहिलीच महापालिका आहे. शहराच्या विकासासाठी व प्रगतीसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. महापालिका ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत मुथियान यांनी केले. तर, सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले. आभार उपमहापौर तुषार हिंगे यांनी मानले. यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी जुन्या सुमधुर गाण्यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button