breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

राष्ट्रपती विधवा असल्याने नव्या संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिलं नाही, हाच तुमचा सनातन धर्म का? उदयनिधींचा मोदींना सवाल

Udhayanidhi Stalin : तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुखचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातनला उद्ध्वस्त करण्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती विधवा असल्याने नव्या संसदेच्या उद्घाटनाला येऊ दिलं नाही, हाच तुमचा सनातन धर्म का? असा सवाल उदयनिधी स्टॅलिन यांनी उपस्थित केला.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. भाजपाने तामिळनाडूतून अधीनम बोलवले होते. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. कारण त्या विधवा आहेत आणि आदिवासी जमातीच्या आहेत. हाच का तुमचा सनातन धर्म? आम्ही या विरोधात आमचा आवाज उठवत राहू.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया; म्हणाले..

दरम्यान, यापुर्वीही उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरून भाजपावर टीका केली होती. त्यावरून चांगलाच वाद झाला होता. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. त्याचा विरोध करता येत नाही, त्यामुळे तो संपवायला हवा. आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलंच पाहिजे. त्याचप्रमाणे, सनातन धर्मालाही संपवायचं आहे, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button