मनोरंजन

सोनमच्या लग्नातील महागड्या अंगठीची सोशल मीडियावर चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आनंद अहुजा सोबत विवाहबंधनात अडकली. सोनमचे लग्न शाही थाटात झाले. या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. मंगळवारी हा विवाह पार पडला त्यानंतर रात्री मुंबईच्या द लीला हॉटेलमध्ये एक शानदार रिसेप्शन पार पडले. यामध्ये बॉलिवूडचा प्रत्येक ज्यूनिअर आर्टिस्ट देखील सहभागी झाला होता. यातच सोनम कपूरचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिने घातलेली अंगठी दिसते आहे. या अंगठीच्या किंमतीची सध्या जोरदार चर्चा आहे.

या अंगठीने सगळ्यांचच लक्ष केंद्रीत केले आहे. सोनमची ही अंगठी तिच्या साखरपुड्याची अंगठी असल्याचे बोलले जात आहे. सोनमचा साखरपुडा कधी झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. पण सोनमच्या या अंगठीची किंमत 90 लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. या अंगठीमध्ये एक हिरा आहे. मेंहदी, संगीत दरम्यानच साखरपुडा देखील झाल्याचं बोललं जातंय. याआधी विराट आणि अनुष्काचं सारखपुड्यात देखील अनुष्काने 1 कोटींची अंगठी घातली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button