TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

तुम्ही बसलेलात त्याच बेस्ट मध्ये होती मुक्ता बर्वे! तुम्ही ओळखलं नाहीत का?

मुक्तानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मुंबईकरांच्या जीवनाच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बेस्ट विषयी मुक्ता बोलली आहे. मुक्तानं नुकताच बसनं प्रवास केला त्याचा फोटो तिनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणाली, ‘जेव्हा रिक्षा आणि टॅक्सी मिळत नाही तेव्हा ‘BEST’ ही सगळ्यात महत्त्वाची ठरते.’

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मुक्ता ही गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मुक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मुक्तानं नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

https://www.instagram.com/muktabarve/?utm_source=ig_embed&ig_rid=0a9a27d7-097b-4670-aa25-6920ae0f516b

मोठया शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेकदा टॅक्सी रिक्षा हा पर्याय वापरला जातो. मात्र कित्येकदा हे चालक खूप जास्त भाडे आकारतात किंवा मग त्यांना जिथे आपल्याला जायचं आहे तेथे कसं जायचं हे माहित नसतं त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होते. मुंबईत असलेली बेस्ट ही सगळ्या कोपऱ्यात जाते. बऱ्याच वेळा आपण सेलिब्रिटींनी रिक्षानं प्रवास करताना पाहिलं आहे. आता मुक्ताला आपण बसनं प्रवास करताना पाहिलं. 

पाहा काय म्हणाले नेटकरी 

मुक्तानं शेअर केलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘ते पण पाच ते सहा रुपयांमध्ये.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मॅडम तुमचे पाय आजही जमिनीवरच आहेत, तुम्ही ग्रेट आहात.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मला तुझ्यात असलेला साधेपणा खूप आवडतो.’ 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button