breaking-newsराष्ट्रिय

जेलमध्ये बंद गँगस्टरची पोलिसांना दारु पार्टी, न्यायालयातून परतताना झाला फरार

आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुख्यात गँगस्टरसोबत दारु पार्टी करणं मेरठमधील पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. बदान सिंग असं नाव असणाऱ्या या गँगस्टरने एका हॉटेलमध्ये पोलिसांना दारु पार्टी दिली आणि संधी मिळताच पसार झाला. याप्रकरणी सहा पोलिसांना अटक करण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. याशिवाय अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी बदान सिंगला सहा पोलिसांच्या सुरक्षेत फतेहगड सेंट्रल जेलमधून गाझियाबाद येथील न्यायालयात नेलं जात होतं. यावेळी परतत असताना मेरठमधील एका हॉटेलमध्ये पोलीस कर्मचारी आरोपीसोबत थांबले होते. 48 वर्षीय आरोपी बदान सिंग याला वकिलाच्या हत्येच्या आरोपाखाली गतवर्षी दोषी ठरवण्यात आलं. 1996 मध्ये ही हत्या कऱण्यात आली होती. अंडरवर्ल्डमध्ये त्याला बड्डो नावाने ओळखलं जातं. आपल्या अलिशान जीवनशैलीसाठी तो ओळखला जातो. त्याच्या नावे हत्या, चोरी आणि खंडणीचे 10 गुन्हे दाखल आहेत.

‘पोलीस कर्मचाऱ्यांना दारु पार्टी दिल्यानंतर अटकेत असणारा आरोपी बदान सिंग याने पळ काढला आहे. याप्रकरणी सहा पोलीस कर्मचारी आणि अन्य तिघांना अटक कऱण्यात आली असून चौकशी सुरु आहे’, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अखिलेश नारायण सिंह यांनी दिली आहे.

भरदिवसा अशा पद्धतीने अटकेतील गँगस्टरने पळ काढल्याने वरिष्ठ अधिकारी चिंतेत आहेत. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच आरोपीने पळ काढला असून नियम पाळण्यात आले नसल्याचं सांगण्यात आलं आहे. बदान सिंग याला ऑक्टोबर महिन्यात मेरठ पोलिसांनी अटक केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला फतेहगड सेंट्रल जेलमध्ये शिफ्ट कऱण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button