breaking-newsराष्ट्रिय

अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळली, 5 ठार

काश्‍मीर – जम्मू-काश्‍मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघं गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान बचाव पथक वेळीच पोचले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. अमरनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही 27 जूनला सुरू झाली. देशातील तब्बल 2 लाख भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत.

अमरनाथला जाण्यासाठी यात्रेकरुंचा एक ताफा बलाटल मार्गे रवाना झाला. मात्र, अतिवृष्टी झाल्याने या भाविकांना 28 जूनला बलाटल बेस कॅम्पलाच लष्कराकडून थांबवण्यात आले होते. याच परिसरात पाऊस थोडा कमी झाल्यावर अमरनाथच्या दिशेने निघालेल्या यात्रेकरुंच्या ताफ्यावर काल दरड कोसळली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button