breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार प्राथमिक शाळा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका, खासगी या 5 वी ते 8 वीच्या 659 शाळा 4 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. मात्र, या प्राथमिक शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांच्या पालकांचे समंतीपत्रक द्यावे लागणार आहे, असे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले.

कोरोना महामारी नियंत्रणात येवू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा 4 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून शहरात महापालिका आणि खासगी मि‌‌ळून एकूण 659 शाळा आहेत. यामध्ये 1 लाख 32 हजार 438 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  सर्व शाळांचे निर्जुंतीकरण, स्वच्छता करुन कोरोनाच्या नियमांचे तंतोतत पालन करायचे आहे. शाळेमध्ये थर्मल स्कॅनर, गण, ऑक्सीमीटर, साबण, पाणी या आवश्यक वस्तुंची उपलब्धता शाळा प्रशासनाने करावी. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची कोविड आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने अतिरिक्त वैद्यकीय अधिका-यांना सादर करणे आवश्यक राहील.

वर्गखोली, स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक नियमानुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी. शाळेत दर्शनी भागात मास्कचा वापरासह इत्यादी मार्गदर्शक सूचना असणारे फलक लावावेत. रांगेत उभे राहण्याकरिता किमान 6 फुट इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे लावावीत. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन शिक्षण विभागाला सादर करावी. शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करणे, स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. त्याची तपासणी करण्याची जबाबदारी पर्यवेक्षकांची राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून दोनवेळा निर्जंतुकीकरण करावे. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व पूर्तता झाल्याचा अहवाल शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी खात्री करावी. तसा अहवाल आयुक्तांना पाठवावे असे परिपत्रकात स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button