breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाविरुद्ध लढा : हिच वेळ देशसेवेची अन्‌ राष्ट्रभक्तीची!

निमित्त वाढदिवसाचे : सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांचे विविध उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोरोना योद्धे जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत देशातील विविध रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज आहे. हीच वेळ आहे देशसेवा करण्याची आणि राष्ट्रभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनामनात तेवत ठेवण्याची, अशा भावना चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांनी व्यक्त केल्या.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे यांनी यावर्षी वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपून साजरा करण्याचे नियोजन केले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या रविवारी, दि. ७ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान रक्तदान शिबीर होणार आहे.  गोकुळम हौसिंग सोसायटी, पाटीलनगर, चिखली येथे शिबीर होईल. रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी विशाल बोरा (9011202282), गणेश मोरे (9765117788), बलराम पवार (9764217365), बाप्पु आमराळे (9922327285) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, व्हाट्सॲपद्वारे नावनोंदणीही करता येणार आहे. हा कार्यक्रम कोविड-19 च्या परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत आणि फिजिकल डिस्टंन्सिंगचे अंमलबजावणी करुन होईल, असेही आयोजकांनी म्हटले आहे.

तसेच, विनायक मोरे स्पोर्टस फाउंडेशनच्या पुढाकाराने चिखली आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी मोफत औषध वाटप करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना व्हायरस संक्रमणाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक औषध म्हणून अर्सेनिक अल्बम-30 हे होमिओपॅथीक औषध सूचवले आहे. हे औषध मिळवण्यासाठी सोमनाथ मोरे (9881669397), दिपक मोरे (9767973727) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

ऑनलाईन चित्रकला स्पर्धा…

तसेच, विनायक मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. चित्र पाठवण्याची अंतिम मुदत दि. ४ जून २०२० आहे. स्पर्धेचे विषय : कोरोनाशी लढणारे पोलीस, डॉक्टर, नर्स इ., महानगरपालिका सफाई कर्मचारी, मदतीच्या काळात समाजसेवा करणारे समाजसेवक, काळजी घेवूया कोरोनाला पळवून लावूया..! असे आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास २१०१ रुपये, द्वितीय १५०१ रुपये आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक १००१ रुपये असे रोख स्वरुपात पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच, ८ ते १८ वयोगटातील सर्वांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तसेच, स्पर्धेचा निकाल ६ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. ही स्पर्धा केवळ चिखली भागापूर्तीच मर्यादित आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपले चित्र संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबरसह अमित मोरे (8408008035), अतुल पठाडे (9764001306), अमोल कदम (9921088991) आणि दर्शन मेजारी (9850752964) या व्हाट्सपवर पाठवावेत, असे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button