breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तळघरात लपवली 700 कोटींची संपत्ती, आयकर विभागाची 5 दिवसांपासून छापेमारी सुरु

जयपूर- राजस्थान मध्ये कुबेराचा खजिना सापडला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 700 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.आयकर विभागाने जयपूरमध्ये सराफा व्यापारी, दोन रियल इस्टेट डेव्हल्परच्या कार्यालय आणि घरी धाडी मारून पावणे दोन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत. एका सराफा व्यापाऱ्याच्या घरात तर तळघर सापडले असून त्यात 700 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सराफ व्यावसायिकाडे 700 कोटींची सपंत्ती
आयकर विभागाने राजस्थानाच्या इतिहासातील सर्वात मोठी रेड टाकून हा कुबेराचा खजिना शोधून काढला आहे. आयकर विभागानं टाकेलल्या छाप्यांची कारवाई सलग 5 दिवस सुरु होती. आयकर विभागानं सराफ व्यावसायिकाच्या कार्यालयांवर आणि घरी छापे टाकले. या छाप्यांमध्ये सराफ व्यावसायिकाकडे तळघर मिळाले. यामध्ये 700 कोटींची संपत्ती असल्याची माहिती आहे.

आयकर विभागाची कारवाई 5 दिवस

राजस्थानाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईत 50 टीम सहभागी झाल्या होत्या. एका टीममध्ये 4 सदस्य असे एकूण 200 कर्मचारी कार्यरत होते. 5 दिवस चाललेल्या कारवाईत हजारो कागदपत्रं आणि दस्त तपासण्यात आले.

आयकर विभागाच्या माहितीनुसार हे छापे जयपूरमधील तीन मोठ्या समुहांवर टाकण्यात आले. सिल्वर आर्टग्रुप, चोराडिया ग्रुप आणि गोकुल कृपा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये 1700 ते 1750 कोटी रुपयांच्या काळा पैशाच्या कमाईचा भांडाफोड झाला आहे.सराफाच्या कार्यालयांवर छापा टाकण्यात आला. तिथे एका ठिकाणी तळघर आढळून आले. त्यामध्ये मूर्ती, किमती खडे, दागिने सापडले, त्याची किमंत अंदाजे 700 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button