breaking-newsमनोरंजन

जुगार अड्डा चालविल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

‘मैंने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. मुंबईतल्या लोखंडवाला भागात जुगार अड्डा चालविल्याचा आरोप हिमालयवर आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी हिमालयला अटक केली असून याप्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे.

मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंधेरीत छापेमारी केली होती. या छापेमारीत १५ लोकांना अटक करण्यात आली होती. या तपासात हिमालय दासानीचं नाव समोर आलं होतं. अंधेरी पश्चिममधील इन्फिनिटी मॉलमध्ये गेल्या महिन्यात पोलिसांनी छापेमारी केली होती. याप्रकरणी हिमालय किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणते वक्तव्य केले नाही.

हिमालयसुद्धा बॉलिवूड अभिनेता आहे. पत्नी भाग्यश्रीसोबत त्याने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भाग्यश्री व हिमालयचा मुलगा अभिमन्यू याने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button