breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आचारसंहितेतही मिळणार राज्य सरकारची मदत

मुंबई – यंदा कोरोनासोबत अवकाळी आणि अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचीही घोषणा केली होती. मात्र, अजूनही शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचलेला नाही. त्यातच, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा हंगमा सुरू झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मदत पोहोचण्यास उशीर होत आहे. म्हणून, अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता काळातही शेतकऱ्यांना मदत देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्र पाठवून काही सूचना दिल्या आहेत, तशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेती आणि शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं. सोयाबीन, तूर, मका, ऊस, कापसाच्या पिकाची नासाडी झाली, काही ठिकाणी जमीनही खरडून गेली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 10 हजार कोटी रुपयाची मदत जाहीर केली. पण अद्याप या मदतीचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडूनही सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. त्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडचण निर्माण झाली होती. पण अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने मदतनिधी वाटपास राज्य सरकारला परवानगी दिल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. आता पहिल्या टप्प्यातील मदतनिधी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांना त्याचं वाटप करण्यात येईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. यावेळी वडेट्टीवारांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मिळून 566 कोटी, मराठवाड्यासाठी 2 हजार 639 कोटी, नाशिक विभागासाठी 450 कोटी, पुणे विभागासाठी 721 कोटी, तर कोकण विभागासाठी 104 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button