breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनचे आर्थिक कंबरडे मोडण्यासाठी चीनी उत्पादनांवर बहिष्काराचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ हवाच: संजय राऊत

भारत आणि चीनदरम्यान दिवसोंदिवस तणाव वाढत असतानाच चीनी मालावर बहिष्कार घालण्यासंदर्भातील मागणी देशात जोर धरु लागली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही आता या मागणीला पाठिंबा दिला असून यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांचे आर्थिक कंबरडे मोडायला हवे असं राऊत यांनी म्हटलं आहे.

आज पुण्यामध्ये ब्राम्हण महासंघातर्फे चीनी मालाची होळी करण्यात येणार आहे. याचसंदर्भातील वृत्ताचा व्हिडिओ शेअर करत राऊत यांनी चीनला धडा शिकवण्याची हीच वेळ असल्याचे म्हटलं आहे. “ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आज पुण्यात चिनी मालाची होळी करत आहेत. वीर सावरकरांनी परदेशी मालाची होळी करण्यासाठी जी जागा निवडली तेथेच हे आंदोलन होत आहे. चीनचे आर्थिक कंबरडे मोडून काढणे हाच एक सर्जिकल स्ट्राइक आहे. चीनला धडा शिकवावा लागेल. वंदे मातरम!,” असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button