breaking-newsपिंपरी / चिंचवड

जिमला सरकारने परवानगी द्यावी, व्यावसायिकांनी घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्य सरकारने जिम व्यावसायासह गर्दी जमा होणा-या सर्वच व्यावसायांना बंदी घातली. आता हॉटेल व्यावसायाला परवानगी देण्यात आली आहे. जिमला देखील परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिम व्यावसायिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात शहरातील जिम व्यावसायिकांनी आज खासदार बारणे यांची भेट घेतली. जिम चालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिम चालू करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन त्यांनी बारणे यांना दिले. त्यावर बारणे यांनी देखील तुमच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात चर्चा करेन. लवकरात लवकर जिम व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन जिम व्यावसायिकांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button