breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनामुक्त झालेले लोक 15 मिनिटांत दुसऱ्या व्यक्तीला बाधित करु शकतात ?

अमेरिकेतील विविध रुग्णांलयातील डेटाच्या विश्लेषणानुसार कोरोनाबाबात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या अतिगंभीर रुग्णांच्या शरीरात जवळपास ९० दिवस SARS CoV-2 व्हायरस असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता अशी भीती व्यक्त होत आहे की, अशा अतिगंभीर रुग्णांच्या शरीरात व्हायरस प्रसार करण्याची क्षमता जास्त असते. त्याचबरोबर भारतात ६४ लाखांहून अधिक लोकांना या रोगाची लागण झाली असून १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सौम्य आणि मध्यम कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फक्त १० दिवस संसर्ग असतो. तसेच, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते. पण असे रुग्ण मध्यम स्वरुपात आजारी असतात ते २० दिवस संसर्गजन्य असतात.

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जे गंभीररित्या आजारी आहेत. ते ९० दिवस संक्रमित असतात, असे अमेरिकेतील अटलांटा येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीत आढळले आहे. अमेरिकेतील एजन्सीच्या विश्लेषणानुसार, कोरोनामुक्त झालेले लोक १५ मिनिटांत दुसऱ्या व्यक्तीला बाधित करु शकतात. तसेच, जर अशा रुग्णांना ९० दिवसांनंतर कोणताही आजार झाला, तर तो कोरोना नसल्याचेही या विश्लेषणामध्ये म्हटले आहे.

यासाठी आयसोलेशन प्रक्रिया महत्त्वाची असून RT-PCR पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आढळून आले. पण त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती असल्याचे दिसून आले. या कॅटगरीमधील रुग्णांची तपासणी दर आठवड्याला केली जात आहे. अँटीबॉडीच्या पातळीनुसार, त्यांना पुन्हा ड्युटीवर घेण्याबाबत ठरविले जाते, असे केअर हॉस्पिटलचे रोगतज्ज्ञ डॉ. मुस्तुफा अफझल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button