breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

जावेद अख्तर म्हणाले,’एवढ्या दूरवर माझे विचार पोहोचतात याचेच मला आश्चर्य वाटतेय’

मुंबई. गीतकार और पटकथा लेखक जावेद अख्तर यांना यंदा प्रतिष्ठेचा रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. अत्युच्च दर्जाचे कार्य आणि तर्कनिष्ठ वक्तव्यांबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. यापूर्वी अमेरिकी कॉमेडियन बिल माहेर आणि तत्त्ववेत्ते ख्रिस्तोफर हिचेन्स यांना या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.

जावेद अख्तर ज्वलंत सामजिक प्रश्नांवर भाष्य करतात. सीएए,तबलिगी जमात, इस्लामोफोबिया यासारख्या विषयांवर त्यांनी अत्यंत तिखट शब्दात टि्वट्स केले आहेत. जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि धर्मनिरपेक्षता व तर्कनिष्ठ विचार मांडणाऱ्या डॉकिन्स यांच्या नावे दिला जातो. जावेद हे स्वत: डॉकिन्स यांचे चाहते आहेत.

पुरस्कार मिळाल्याची बातमी कळाल्यानंतर जावेद म्हणाले, एवढ्या दूरवर माझे विचार पोहोचतात याचेच मला आश्चर्य वाटतेय. माझ्या धर्मनिरपेक्ष विचारांशी जगातील अनेक लोक सहमत आहेत ही माझ्यादृष्टीने आनंदाची बाब आहे.

जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी या पुरस्कारासाठी त्यांचे कौतुक केले आहे. हा पुरस्कार जावेद अख्तर यांच्यासाठी एका प्रेरणास्त्रोताचं काम करेल, असे त्या म्हणाल्या आहेत.

त्यांनी ट्विट केले, “रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार मिळाल्याबद्दल जावेद अख्तर यांचे अभिनंदन. मानवतावादी मुल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार जावेद अख्तर यांना भविष्यात आणखी काम करण्यासाठी एका प्रेरणास्त्रोताचे काम करेल.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button