breaking-newsराष्ट्रिय

जानेवारी ते मार्च महिन्यात लग्नाला बंदी, योगी सरकारचा आदेश

पुढील वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये लग्नसोहळ्यास उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथे बंदी घालण्यात आली आहे. अशाप्रकारचा आदेशच उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने काढला आहे. तसंच या आदेशाची प्रतही लग्न समारंभासाठी हॉल देणाऱ्या मालकांकडे देण्यात आली आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान येथे कुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रयागराज येथे जानेवारी ते मार्च महिन्यात कुणी लग्नासाठी हॉल बुक केला असेल किंवा इतरही बुकिंग केलं असल्यास नागरिकांनी आपले पैसे परत घ्यावेत, असे योगी सरकारकडून सांगण्यात आले आहे. यासंबंधित लेखी सूचना हॉटेलमालक आणि लग्नासाठी हॉल देणाऱ्या मालकांना देण्यात आली आहे. प्रयागराज वगळता इतर शहरांमध्ये लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुढील वर्षी कुंभमेळय़ात पाच पवित्र स्नान होणार आहेत. पहिले स्नान हे मकर संक्रांतीला तर दुसरे पवित्र स्नान पौष पौर्णिमेला होत आहे. त्यानंतर, फेब्रुवारी महिन्यात मौनी आमावस्या, वसंत पंचमी आणि माघी पौर्णिमेला होणार आहे. तर मार्च महिन्यात महाशिवरात्री एकादशीला पवित्र स्नान होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button