breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात भाजपसाठी धोक्याची घंटा

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि जेडीएस या पक्षाने आघाडी करत भाजपला धक्का दिला आहे. पण ही आघाडी भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर कर्नाटकमध्ये भाजपला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागेल, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, काँग्रेस आणि जेडीएस हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले असून त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा देखील केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने मंगळवारच्या निकालाच्या आधारे लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज घेतला आहे. कर्नाटकमधून लोकसभेच्या २८ जागा आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि जेडीएस हे पक्ष एकत्र आले तर भाजपला फक्त ६ जागांवरच विजय मिळेल, अशी आकडेवारी सांगते. तर दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस या पक्षाची आघाडी कायम राहिली तर त्यांना तब्बल २२ जागांवर विजय मिळू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button