breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जाधव यांची महापौर पदी निवड झाल्याने गृह संस्थेतर्फे “वही तुला”
पिंपरी – मोशी येथील कमलराज दत्त विहार गृह संस्थेच्या वतीने राहुल जाधव यांची महापौर पदी निवड झाल्याने वही तुला करण्यात आली. यावेळी युवानेते योगेश बोराटे, मंगेश बोराटे, राम देवडेकर, सुहास टिळेकर व सर्व सभासद उपस्थित होते. यावेळी महापौर जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच, वही तुला केलेल्या सर्व वह्या अनाथ आश्रमातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.