Uncategorizedताज्या घडामोडी

बंदी वादी कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर जीव घेणा हल्ला

नाशिक: बंदी वादी कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दहा ते बारा कैद्यांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती आहे. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

बॅरेक का चेंज केलं, असा सवाल या पोलीस कर्मचाऱ्याने या कैद्यांना केला होता. त्यावरुन या कैद्यांनी प्रभू चरण पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी ही मारहाण केल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेल्या कैद्यांनी ही मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. १० ते १२ कैद्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याने कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

एक महिन्यापूर्वीच पुण्याच्या येरवडा जेलवरून या कैद्यांना नाशिकला आणलं होतं. कारागृहात पोलीस कर्मचारी सुरक्षित नाही, असं चित्र यावरुन दिसून येत आहे. या घटनेत जखमी झालेल्या प्रभूचरण पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पुढील तपास सुरु आहे.

गिरीश महाजन नाशिकचे तर गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री?

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button