breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गुवाहाटीमधील ‘रेडिसन ब्ल्यू’ हॉटेलचा मोठा निर्णय… वाचा

मुंबई : महाराष्ट्रात सध्या मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे. याची सगळी सूत्रं ही गुवाहाटीच्या पंचतारांकीत ‘रेडिसन ब्ल्यू’ या हॉटेलमधून हालवली जात आहेत. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार राहत असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलकडून आता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये ३० जूनपर्यंत कोणत्याही सामान्य ग्राहकाला बुकिंग करता येणार नाही. सामान्य ग्राहकांसाठी ३० जूनपर्यंत सर्व बुकींग्स बंद केल्या आहेत. इतकंच नाहीतर हॉटेलने बाहेरील ग्राहकांसाठी रेस्टॉरंटसारख्या इतर सर्व सुविधाही बंद केल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपामुळे या हॉटेलला एका छावणीचं स्वरुप आले आहे.
या हॉटेलमध्ये फक्त एअरलाइन कंपन्यांचे कर्मचारीच जाऊ शकतात, ज्यांचा हॉटेलशी करार आहे आणि त्यांच्या खोल्या आधीच बुक केल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

एकूण ७० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदार, खासदारांसाठी रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमधील तब्बल ७० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. मुंबईपासून गुवाहाटी अडीच हजार किमीहून अधिक अंतरावर असेल, पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईच्या प्रत्येक राजकीय हालचालीवर इथून नजर ठेवली जात आहे आणि त्याचा बदलाही इथूनच घेतला जात आहे. लवकरच शिवसेनेचे आणखी काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
एकनाथ शिंदे गटाने रविवारी सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या देखरेखीखाली सोमवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या नोटीसविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासोबतच अजय चौधरी यांनाही नेता बनवण्यासाठी न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. कपिल सिब्बल सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे यात काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button