breaking-newsक्रिडा

आफ्रिदीने माझ्यासोबत नेहमी भेदभाव केला, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची खंत

कराची : पाकिस्तानचा माजी कप्तान शाहीद आफ्रिदीने नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य किंवा ट्रोलिंगमुळे चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानात त्याचे गौतम गंभीरसह अनेक भारतीय खेळाडुंशी वाद झाले आहेत. काश्मीर मुद्द्यावरुन शाहीदने नेहमी आक्रमक भुमिका घेतली आहे. यावरुन देखील त्याला भारतीयांच्या रोषाला सामोरं जात असतो. सध्या पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटपट्टूने केलेल्या आरोपामुळे आफ्रीदी पुन्हा चर्चेत आलाय.

शाहीद आफ्रीदीची कॅप्टन्सीमध्ये खेळताना माझ्यासोबत भेदभाव झाल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी स्पिनर दानिश कानेरीयाने केलाय. मला टीम बाहेर फेकण्यातही आफ्रीदीचा हात असल्याचे दानिशने सांगितले. 

मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली दानिशवर बंदी आहे. त्याने हे आरोप मान्य केले आहेत. धर्माच्या आधारवर दानिशसोबत पाकिस्तानी टीममध्ये भेदभाव व्हायचा असा आरोप पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केला होता. शोएबने गेल्यावर्षी केलेल्या या आरोपानंतर त्या खेळाडुंची नाव सांगू असे कानेरियाने म्हटले होते. शोएब पूर्ण खरं बोलल्याचे दानिशने सांगितले. 

मी इंजमाम उल हक यांच्या कॅप्टन्सीखाली ३ वर्षे खेळलो. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. नंतर युनूस खानच्या कॅप्टन्सीखाली भारत दौऱ्यावर आलो. त्यांनी देखील कधी भेदभाव केला नाही. ते नेहमी सर्वांना सहकार्य करायचे. पण आफ्रिदी नेहमी माझ्या विरोधात असायचा. मी ६१ टेस्ट आणि १६ वनडे खेळलोय. दरवर्षी मला २ किंवा ३ वनडे खेळायला मिळायच्या असे देखील त्याने म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button