breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवावी – भाऊसाहेब भोईर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

नोबेल कोविड – 19 कोरोना विषाणूची बाधा शहरात पोहोचण्याच्या अगोदरच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाद्वारे योग्य काळजी घेऊन तत्संबंधीत सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्याची सूचना नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील बहुतांश देशांमधील महत्वाच्या शहरांतील दळणवळण बंद पडल्यात जमा आहे. या विषाणुची लागण झाल्याचे 40 रुग्ण भारतात आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. राज्यात आणि आपल्या परिसरात या विषणुचा प्रादुर्भाव पोहोचण्यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात यावी. आपल्याकडून दुर्लक्ष झाल्यास विषाणुचा शहरात फैलाव व्हायला वेळ लागणार नाही, अशी चेतावणी भोईर यांनी दिली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात बाधित किंवा संशयीत रुग्णांसाठी बाह्य रुग्ण विभाग तयार करावा. आवश्यक औषधे आणि साधण सामग्री उपलब्ध ठेवावी. मनपा कार्यालये, दवाखाने, शाळा, विविध प्रकल्प केंद्रांमध्ये हात धुण्यासाठी आणि निर्जंतूक करण्याचे दृव्य उपलब्ध करावे. मास्क उपलब्ध करावेत. सर्व कार्यालये, दावाखाने, उद्याने, शाळा, विरंगुळा केंद्रे आदी ठिकाणी विषाणुंच्या साथीची माहिती पत्रके लावण्यात यावीत. विषाणुंच्या साथीच्या प्रतिबंधात्मक तयारीसाठी स्वतंत्र अभियान हाती घेऊन प्रसार माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

आपण सर्वजण या विषाणुंचा प्रतिकार करण्यासाठी उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक पाऊल उचलले तर या विषाणुंची बाधा शहराला होणार नाही. या कार्यात आवश्यक वाटेल ते सहकार्य करण्याची आपली भूमिका राहील, असे भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button