breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचे दर 1.06 टक्क्यांनी वाढले; सोन्यातील गुंतवणुकीचा ओघही वाढला

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचे दर १.०६ टक्क्यांनी वाढलेत. सोने स्टँडर्ड २०३९.४ डॉलर प्रती औंसवर बंद झालंय. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली बिकट आर्थिक स्थितीमुळे सोन्याच्या किंमतीतील वाढ झाल्याचं बोलंल जात आहे.


अमेरिकेने कोव्हिड-१० चा प्रभाव वाढण्याच्या संकेतांमुळे प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली. त्यामुळे सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला. अमेरिकी डॉलरमध्ये घसरण झाल्याने वास्तविक रिटर्नमध्ये तीव्र घसरण झाली. मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी नॉन-यील्डच्या गोल्डन असेटच्या दिशेने गुंतवणुकीचा कल दर्शवला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमती गुरुवारी ०.५७ टक्के कमी होऊन त्या ४२.० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाल्या. कोव्हिड-१९ केसमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे अमेरिकेत क्रूड ऑइलच्या आउटलुकवर साशंकता निर्माण झाली. कोव्हिड-१९ चा प्रभाव वाढण्याच्या शक्यतांदरम्यान अमेरिकेच्या नव्या स्टिम्युलस डीलमुळे कच्च्या तेलाच्या मागणीची शक्यता अजूनही दबावाखाली आहे. अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्यामुळे अमेरिकी इन्व्हेंट्रीच्या पातळीत घसरण झाली. त्यामुळे तेलाच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. यासह अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. यामुळे इतर देशांच्या चलनधारकांसाठी तेलाच्या किंमती कमी झाल्या.

दरम्यान, एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अमेरिकी बाजारात क्रूड ऑइल इन्व्हेंट्री पातळीचा अंदाज (३ दशलक्ष बॅरल) २०२० च्या अखेरच्या आठवड्यात वाढून ७.४ दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button