breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगावात 60 वर्षीय वृद्ध महिला कोरोनामुक्त होऊन घरी

जळगाव | दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. चिंता, भितीत असणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यात आढळून आलेली तिसरी कोरोनाबाधीत अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द महिला कोरोनामुक्त होऊन बुधवारी घरी परतली आहे. कोरोना रुग्णालयात डॉक्टरांसह 36 जणांच्या स्टॉफच्या यशस्वी उपचारानंतर 17 व्या दिवशी महिला कोरोनामुक्त झाली आहे. डॉक्टरांसह कर्मचार्‍यांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत करण्यात आले. यावेळी वृध्द महिलेने आपल्या शब्दात डॉक्टरांचे आभार मानले.

17 एप्रिल रोजी अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील 60 वर्षीय वृध्द कोरोना संशयित म्हणून कोरोना रुग्णालयात दाखल झाली होती. दुसर्‍या दिवशी 18 रोजी दिवसा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती महिला कोरोनाबाधीत असल्याचे समोर आले होते. अवघ्या 15 दिवसात ही वृध्द महिला कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान या महिलेला दोन दिवस कोरोना रुग्णालयात वैद्यकीय यंत्रणेच्या निगराणीत ठेवण्यात आले. यानंतर ती प्रकृती चांगली असल्याने तिला बुधवारी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत डिचार्ज देण्यात आला. त्यांना एका रुग्णवाहिकेतून मुंगसे येथे त्यांच्या घरी पाठविण्यात आले. या कोरोना योध्द्यांमुळे जिल्ह्यात दुसरा कोरोनोबाधीत बरा चौदा दिवस धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील दुसरा व पहिलीच महिला रुग्ण बरी होऊन घरी परतली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्याला 17 दिवसात बरे करण्यात या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला याचे समाधान आहे. नागरीकांनी कोरोनाला घाबरु नये, पण काळजी घ्यावी. तसेच आमच्याकडे उपचार घेत असलेले रुग्ण लवकरच बरे होऊन त्यांना सुखरुप घरी पाठविण्यात आम्हाला यश येईल. आणखी सात रुग्ण बरे होतील, अशी आशा आहे शासकीय महाविद्यालय,अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button