breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची रामनगर, (चिंचवड) येथे मंगळवारी पहाटे जलवाहिनी फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले.

चिंचवड येथील सहजीवन कंपनीसमोर जलवाहिनी फुटली. यामुळे आठ ते दहा फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडत होते. जलवाहिनी फुटल्यामुळे रामनगर परिसर जलमय झाला आहे. सकाळी उशिरापर्यंत पाणी वाया जात होते.

हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button