breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘जय श्री राम’ लोण महाराष्ट्रातही पसरतेय, जमावांकडून एका तरुणाला मारहाण

औरंगाबाद – ‘जय श्री राम’ या घोषणेवरुन सध्या देशभरात राजकारण सुरू आहे. आता याचे लोण औरंगाबाद शहरातही पसरले आहे. जय श्रीराम घोषणा देण्याची सक्ती करत एका तरुणाला जमावाने धमकी दिली आहे. रविवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला.

ज्या व्यक्तीला ही धमकी देण्यात आली ती झोमॅटोचा कामगार असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझार चौकाजवळ ही घटना घडली असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी दाखल झाले. याविषयी आम्ही स्टेटमेंट घेऊन एफआयआर दाखल करणार आहोत. त्यांना थांबवून नारा देण्याससांगण्यात आले. या लोकांवर कारवाई करण्यात येईल. लोकांनी शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या येथील वातावरण नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button