breaking-newsराष्ट्रिय

जम्मू-काश्मीर: लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एकजण जखमी

जम्मू-काश्मीर येथील लष्कराच्या आरआर कॅम्पवर गुरुवारी सकाळी अचानक दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एका स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे समजते. सुरक्षा दलाच्या चोख प्रत्युत्तरानंतरही दहशतवादी पसार होण्यात यशस्वी झाले.

ANI

@ANI

Jammu and Kashmir: One civilian injured during an exchange of fire between security forces and terrorists, the exchange of fire ensued after terrorists fired upon a camp in Khudwani area of Kulgam. The injured has been admitted to hospital. Security forces have cordoned the area.

ANI यांची इतर ट्विट्स पहा

गुरुवारी सकाळी अचानक जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील स्कॉस्ट रिसर्च सेंटर स्थित लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. सुरक्षा दलांनी त्वरीत प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येते. लष्कराकडून गोळीबार सुरु असतानाच दहशतवादी पसार होण्यात यशस्वी ठरले. दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोध मोहीम राबवण्यात आली आहे.

दरम्यान, १७ नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी कुलगाम येथील एका व्यक्तीचे अपहरण करुन त्यांची हत्या केली होती. तो लष्कराचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन दहशतवाद्यांनी हे कृत्य केले होते. हुजैफ अश्रफ (वय १९) असे मृत व्यक्ती नाव असून तो कुलगाम जिल्ह्यातील मंझगामचा रहिवासी होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button