breaking-newsराष्ट्रिय

‘जिओ’मुळे मोफत ‘इनकमिंग कॉल’ होणार बंद?

भारतीय दूरसंचार क्षेत्रात रिलायंस जिओ आल्यापासून बऱ्याच कंपन्या डबघाईला लागल्या, तर अनेक कंपन्या कशाबशा बाजारात तग धरुन आहेत. परिणामी अनेक दूरसंचार कंपन्या लवकरच मोबाइल धारकांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. जिओने स्वस्त इंटरनेट पॅक उपलब्ध करून दिल्याने आपला ग्राहक वर्ग टिकवण्यासाठी इतर सर्वच कंपन्यांनीही स्वस्त दरात इंटरनेट पॅक उपलब्ध करुन दिले. जिओने डेटा आणि दरयुद्ध छेडल्यानंतर इतर कंपन्यांनीही कॉल दर कमी केले. पण यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी आता या कंपन्यांनी ‘इनकमिंग कॉल’साठी शुल्क आकारण्याची तयारी सुरु केल्याचं समजतंय.

जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि बीएसएनएल सारख्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता मोफत इनकमिंग कॉल सुविधा न देण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत या कंपन्या आहेत. सध्या तरी अनेक युजर्स असे आहेत की, फक्त इनकमिंग कॉलसाठी मोबाईल वापरतात. एके काळी मोबाईल कंपन्या आऊटगोइंगच नव्हे, तर इनकमिंगसाठी शुल्क आकारत होत्या. आता ग्राहकांना इनकमिंग कॉलसाठी महिन्याला (28 दिवस) 35 रुपयांचा रिचार्ज करावा लागण्याची शक्यता आहे. अन्यथा आउटगोइंगच नव्हे, तर इनकमिंग सेवाही बंद केली जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button