breaking-newsराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला आहे. तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणांना श्रीनगरच्या बाहेर परिमपोरा नाक्यावर थांबवण्यात आले. त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आढळून आला. त्यानंतर त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

ANI

@ANI

Jammu & Kashmir Police: Three terrorists affiliated with the proscribed terror outfit Jaish-e-Mohammed (JeM) were arrested today based on a credible input. Incriminating material including ammunition & live rounds recovered. A case has been registered.

१२५ लोक याविषयी बोलत आहेत

लष्कराच्या २ आरआर बटालिअनने जम्मू-श्रीनगर महामार्गावर परिमपोराजवळील नाक्यावर एक मारुती ८०० कार तपासणीसाठी थांबवली. यामध्ये असणारे तिघे तरुण शहीद भट, रईस हुर्राह, इशाक लोन हे जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याचे उघड झाले. तसेच त्यांच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणावर दारु गोळा आणि शस्त्रे सापडली, असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button