breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

T20 World Cup 2021 : आजपासून टी-20 विश्वचषकाचा शुभारंभ

मस्कत – नुकतीच आयपीएल 2021 ही भव्य स्पर्धा संपली असून आता लगेचच आणखी एक मानाची स्पर्धा क्रिकेट रसिकांसाठी सुरू होत आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आयसीसी टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. या विश्वचषकासाठी जगभरातील संघ सज्ज झाले आहेत. आज म्हणजेच, 17 ऑक्टोबर रोजी या स्पर्धेच्या पात्रता फेरीचा पहिला सामना ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर खेळवला जाईल. तर 14 नोव्हेंबर रोजी दुबईत खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात स्पर्धेचा विजेता ठरवला जाईल.

शेवटचा टी-20 विश्वचषक 2016 मध्ये भारतात खेळला गेला. यंदाही ही स्पर्धा भारतातच होणार होती. परंतु कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे ती यूएई आणि ओमानमध्ये हलवण्यात आली. दरम्यान, यंदा टी-20 विश्वचषक तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये खेळवला जाईल. मुख्य स्पर्धा सुपर 12 स्वरूपात खेळली जाणार आहे. ज्यासाठी भारतासह आठ अव्वल संघ आयसीसी रँकिंगच्या आधारे आधीच पात्र ठरले आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी हे आठ संघ पात्रता सामने खेळताना दिसतील. हे आठ संघ गट अ (Group A) आणि गट ब (Group B) मध्ये विभागले गेले आहेत. आज यजमान ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात ब गटातील पहिल्या पात्रता सामन्यासह स्पर्धेची सुरुवात होईल आणि याच गटाचा दुसरा सामना आज स्कॉटलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाईल. तर 18 ऑक्टोबर रोजी ब गटातील आयर्लंड-नेदरलँड्स आणि श्रीलंका-नामिबिया यांच्यातील सामने अबुधाबीमध्ये खेळले जातील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील.

टी-20 विश्वचषकासाठी भारताला पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानसह गट 2 मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर गट 1 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश आहे. पाहूया, भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक :

24 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि क्वालिफायर्स (पात्रता फेरीत ब गटातील विजेता)
नोव्हेंबर 8: क्वालिफायर्स वि भारत (पात्रता फेरीत अ गटातील उपविजेता संघ)

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button