breaking-newsमहाराष्ट्र

#Lockdown:बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी

मुंबई : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊन 4.0 नव्या नियामावलीत बिगर रेड झोनमधील सलून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दाढी-केस कापण्यासाठी वाट पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सलून सुरु केल्यानंतर मास्क, हँड सॅनिटायझरबाबतचे नियम आणि कोरोना संदर्भातील अटी-शर्थींचे पालन करणे सलून चालकांना बंधनकारक असणार आहे.

बिगर रेड झोनमधील सलून सुरु झाल्याने तेथील नागरिकांना वाढलेल्या दाढी-केस यांच्यापासून सुटका मिळणार आहे. सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कठीण आहे. त्यामुळे सलून जरी सुरु झाले तरी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक दाढी-केस कापण्यासाठी सलूनमध्ये जाणार का? हा मोठा प्रश्न आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातही ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र स्थानिक प्रशासनाने तेथील कोरोनाच्या संसर्ग परिस्थितीनुसार निर्णय घेतल्याने अनेक ठिकाणी सलून बंदच होते. मात्र लॉकडाऊन 4 मध्ये  आता कोणताही निर्णय घेताना स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांच्या परवानगीचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाशिवाय किंवा त्याच्या विपरित कोणतेही आदेश काढायचे असल्यास स्थानिक प्रशासनाला मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर अनेकांनी घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर केले होते, तर काहींना दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता, यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळी यांचाही समावेश होता.

गेल्या दोन महिन्यापासून सलून बंद असल्याने सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काही संघटनानी अटी-शर्थींसह सलून उघडण्याची परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती देखील केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button