breaking-newsआंतरराष्टीय

जपानला जेबी चक्रिवादळाचा तडाखा; 9 जणांचा मृत्यू

टोकियो – जपानला जेबी या चक्रिवादळाचा फटका बसला असून या चक्रिवादळामुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. वादळी हवामानामुळे देशातील प्रमुख विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. जेबी या चक्रिवादळाचा तडाखा मंगळवारी दुपारी जपानच्या पश्‍चिम किमारपट्टीला बसला. त्यामुळे ताशी 216 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आणि मुसळधार पावसालाही सुरुवात झाली.

वादळाचा जोर इतका होता की अनेक घरांवरील छपरे उडून गेली आणि पूलांवरील ट्रकही उलटले. ओसाका उपसागरामध्ये नांगरून ठेवलेला 2,591 टन वजनाचा टॅंकरही वाहून गेला. यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या पूलाचे मोठे नुकसान झाले आहे. हा विमानतळ एका बेटावर आहे. त्यामुळे विमानतळाचा मुख्य भूमीशी संपर्कच तुटला आहे. या बेटावर सुमारे 3 हजार लोक मदतीविना अडकून पडले आहेत. विमानतळावरील धावपट्टी आणि भुयारीमारेगामध्ये पाणी साचून राहिले आहे. एकूण 800 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

देशात ठिकठिकाणी इमारतींची पडझड झाली असून त्यामध्ये शेकडोजण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने सुमारे 10 लाख लोकांना सुखरूप ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले होते. एकूण 29 हजार जणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर 16 हजार नागरिकांनी तात्पुरत्या आश्रयामध्येच रात्र काढली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button