breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय : विनामास्क फिरणा-या 242 जणांवर कारवाई

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होत असल्याचे घटत्या रुग्णसंख्येवरून सिध्द होत आहे. तरी, मास्क वापरण्याचे निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाही. परंतु, काही नागरिकांकडून या कडक नियमांचे उल्लंघन होत असताना दिसते आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये विनामास्क फिरताना आढळून आलेल्या एकूण 242 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

त्यामध्ये एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 36 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. भोसरी 11, पिंपरी 07, चिंचवड 15, निगडी 03, आळंदी 41, चाकण 06, दिघी 14, सांगवी 10, वाकड 00, हिंजवडी 34, देहुरोड 28, तळेगाव दाभाडे 00, तळेगाव एमआयडीसी 00, चिखली 13, रावेत चौकी 05, शिरगाव चौकी 18, म्हाळुंगे चौकी 01 अशा एकूण 242 जणांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही विनामास्क व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही. हे विशेष आहे. ग्रामीणचा विचार केला तर तळेगाव दाभाडे आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात विनामास्कची एकही कारवाई केली नसल्याचे नमूद आहे.

पोलिसांच्या कारवाईमुळे कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होत चालला आहे. कारण, विनामास्क आढळून आलेल्या व्यक्तीवर पोलिसांची शिस्तबद्द कारवाई होत आहे. नागरिकांच्या मनामध्ये कारवाईची भिती बसली आहे. फुकट पोलिसांच्या कारवाईची शिकार होण्यापेक्षा तोंडावर मास्क घालवून फिरणे केव्हाही चांगले, असा विचार आता समाजामध्ये दृढ होत चालला आहे. राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी घातलेल्या मास्क वापराच्या नियमांचे पालन होत आहे. तथापि, पोलिसांनी कारवाई आणखीन तिव्र करण्याची गरज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button