breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

राऊत म्हणाले, ‘मावळे असतात म्हणून राजे असतात’, आता संभाजीराजेंच्या मुलाकडून जोरदार प्रत्युत्तर

सोलापूर : आपल्याला राजकारण फार काही कळत नाही पण काल माध्यमांत बातमी होती की, मावळ्यांमुळे छत्रपती घडतात. पण मला सांगायचंय की छत्रपतीही मावळे घडवतात. ही देवाण-घेवाणीची प्रक्रिया आहे, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati ) यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती (Yuvraj Shahajiraje Chhatrapati) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी पलटवार केला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपल्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं होतं. खास करुन त्यांनी शिवसेनेला विनंती केली होती. परंतु शिवबंधन बांधा, आम्ही तुमची उमेदवारी जाहीर करतो, अशी भूमिका सेनेने घेतली. सेनेची भूमिका संभारीजेंना मान्य नसल्याने सध्या त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं वृत्त आहे. तत्पूर्वी संभाजीराजे-सेना यांच्या घमासानादरम्यान संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सोलापूर शहरातील सामाजिक संघटना संभाजी आरमारच्या १४ व्या वर्धापन दिनी शिवपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले होते. मात्र राज्यसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांनी युवराज छत्रपती शहाजीराजे यांना सोलापूरात पाठवले होते. यावेळी केलेल्या मोजक्या भाषणात त्यांनी सूचक पण सध्याच्या राजकीय परिस्थितीला धरुन महत्त्वाचं विधान केलं.

यावेळी बोलताना आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले, “आम्हाला राजकारण कळत नाही. पण जे राजकीय नेते आमच्याकडे ४२ आमदार आहेत, असं म्हणतात त्यांचे ४२ आमदार एका छत्रपतींमुळे आहेत हे विसरु नये.” या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“संभाजीराजेंना अपक्ष लढायचं असेल तर त्यांच्याकडे ४२ मतं असतील. आमच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिला त्यावेळी गादीचा सन्मान, छत्रपतींचा सन्मान याचा विचार करुनच आम्ही त्यांना पुढील प्रस्ताव दिला. शेवटी मावळे असतात म्हणून राजे असतात”, असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button