breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री. छत्रपती संभाजी महाराज उड्डाण पुलाचा एक मार्ग वाहतुकीस खुला

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – जगताप डेअरी साई चौकातील औंध-रावेत बीआरटी मार्गावरील श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुलाचा एक मार्ग सोमवारी (दि. 31) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रावेतकडून पुण्याकडे जाणा-या वाहनांना हा मार्ग खुला झाल्याने काळेवाडी फाटा ते शिवार चौकाकडे वळविलेली एकेरी वाहतूक पुर्ववत होऊन कोंडी टळणार आहे.

भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते श्री छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूलाचे उदघाटन झाले. याप्रसंगी स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, राज्य लोकलेखा समितीचे अॅड. सचिन पटवर्धन, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका शितल काटे, आरती चोंधे, प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी सतिशकुमार खडके, प्राधिकरणचे अधिक्षक अनिल सुर्यवंशी, महापालिकेचे शहर अभियंता ओंभासे आदी उपस्थित होते.

नगरसेवक काटे पती-पत्नी यांनी प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याशी चर्चा करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा एकेरी मार्ग सुरू करण्याची मागणी केली होती. पुलाचे बांधकाम चालू असताना काळेवाडीकडून औंधमार्गे पुण्याकडे जाणा-या वाहनांना शिवार चौकातून वळून परत साई चौक जगताप डेअरीकडे वळावे लागत होते. त्यामुळे शिवार चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वर्दळीचा सामना नागरिकांना करावा लागत होता.

जवळच असलेल्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणारा कार्मचारी वर्ग पिंपळे सौदागर भागात मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांना नोकरीसाठी जाण्याकरिता वाहतूक कोंडीमुळे मानसिक त्रास होत होता. आता काळेवाडीहून पुण्याकडे जाणारी वाहने पुलावरून गेल्यास शिवार चौक तसेच साई चौकातील वाहतुकीवरचा ताण कमी होईल. हा उड्डाणपूल एकेरी वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button