breaking-newsपुणे

वाहतूककोंडीचा ‘सरचार्ज’ प्रवाशांच्या माथी

पुणे : वाहतूककोडींने त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या खिशावरही ताण पडत आहे. शहरात सुरू असलेल्या ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या कॅब प्रवासादरम्यान वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना सरचार्ज म्हणजे अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. नवी दिल्लीतील वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर तेथील कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी गर्दीच्या वेळी सरचार्ज न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय पुणेकरांसाठी कधी होणार, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


शहरामध्ये बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा दररोजच सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरे तसेच शहरालगतच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. मागील काही महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने या कोंडीत आणखी भर पडली आहे. स्वारगेट ते हडपसर, नगर रस्ता, चांदणी चौक, कर्वे रस्ता, हिंजवडी, येरवडा, मुंढवा, शिवाजीनगर, पुणे स्टेशन यांसह अन्य भागांमध्ये सातत्याने वाहतूककोंडी होत असते. याचा फटका सर्वसामान्य पादचाºयांनाही सहन करावा लागतोय. कोंडीमुळे वेळ आणि इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जाते. तसेच वाहनचालकांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होतो. त्याचप्रमाणे प्रवाशांना आर्थिक भारही सोसावा लागत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button