breaking-newsराष्ट्रिय

छाव्यांशी खेळणाऱ्या मुलाचे शीर सिंहिणीने धडापासून केलं वेगळं

गुजरातमधील गीर अभयारण्याजवळील अमरेली जिल्ह्यात असणाऱ्या बछादार गावात ही दूर्देवी घटना घडली. किशोर देवीपूजक असे मृत मुलाचे नावं असून तो त्याच्या आई वडिलांबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होता. मंगळवारी किशोर आपल्या घराबाहेर अंगणात झोपला होता. त्यावेळी अचानक जवळच्या झुडपांमधून सिंहाचे दोन छावे तेथे आले. छाव्यांच्या डरकाळीमुळे किशोरला जाग आली तेव्हा दोन्ही छावे त्याच्यासमोरच उभे होते. हे छावे आपल्यावर हल्ला करतील असं अंदाजही लहानश्या किशोरला नव्हता. तो त्या छाव्यांशी खेळू लागला आहे.

सिंहाच्या छाव्यांचा आवाज येऊ लागल्याने किशोरचे पालक झोपडीबाहेर आले असता, समोरचे दृष्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते काही करण्याआधीच झुडपामधून सिंहिणीनं किशोरवर झडप घातली आणि त्याला जंगलात फरफटतं नेलं. किशोरच्या पालकांनी या सिंहिणीचा आणि तिच्या छाव्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच फायदा झाला आहे. ही सिंहिण किशोरला जबड्यामध्ये पकडून जंगलामध्ये तीन किलोमीटरपर्यंत निघून गेली होती. या घटनेसंदर्भात वन अधिकारी आणि पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी किशोरच्या पालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता त्यांना किशोरच्या शरिराचे अवशेष अढळून आले. किशोरचे शीर अद्याप सापडलेलं नाही. पोलीस आणि वन अधिकाऱ्यांना सिंहिणी आणि तिच्या छाव्यांचा शोध घेण्यात यश मिळालं आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button