breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवादी ठार

  • कारवाईपूर्वीच जवानाचे हृदयविकाराने निधन

दंतेवाडा : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्य़ात मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका नक्षलवाद्याला ठार केले. या वेळी जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी एका जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे पोलिसांनी सांगितले.

सुरक्षा दलाची दोन स्वतंत्र पथके नक्षवादविरोधी कारवाई करीत असताना पितेपाल गावाजवळ सकाळी नऊ वाजता ही चकमक उडाली. दंतेवाडा आणि सुकमा जिल्ह्य़ांच्या सीमेवरील काटेकल्याण जंगल परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणावर माओवादी असल्याची खबर मिळाल्याने सुरक्षा दलाच्या जवळपास ४०० जवानांना तेथे पाठविण्यात आले. या नक्षलवाद्यांची मोठा हल्ला करण्याची योजना होती.

एक पथक पितेपाल गावातील जंगलास वेढा घालत असताना दोन्ही बाजूंनी गोळीबारास सुरुवात झाली. मात्र नक्षलवादी लवकरच घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर घटनास्थळी शोध घेतला असता एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला. त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन मॅगझीन्स हस्तगत करण्यात आले.

या चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला, तर कारवाईपूर्वी राखीव दलाचा साहाय्यक कॉन्स्टेबल कैलास नेताम याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे पलिसांनी सांगितले. ठार झालेल्या नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button