breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काँग्रेस : आजी ‘सोनिया’चा दिनू ! वर्षे अमृताचा घनू !

  • मध्यप्रदेश, राजस्तान, छत्तीसगढ येथे काँग्रेसची सरशी
  • अडगळीत कार्यालयाला रंगरंगोटी, पक्षात आनंदोत्सव

पुणे/पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. देशभरासह पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना देखील या निकालामुळे उर्जीतावस्था प्राप्त झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिका-यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे “पक्षात आजी ‘सोनिया’चा दिनू! वर्षे अमृताचा घनू!” असे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवंगत नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर शहर काँग्रेसची घसरण सुरू झाली. राष्ट्रवादीची महापालिकेवर सत्ता असताना काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्याची संधी तरी मिळाली होती. त्यावेळी शहरात काँग्रेसचे थोडेफार वलय दिसत होते. मात्र, 2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर नऊ नगरसेवकांसह राष्ट्रवादीत गेल्याने मोजक्याच पदाधिका-यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आली. सचिन साठे यांच्याकडे शहराध्यक्ष पद आले, मात्र, पालिका निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला. एकही नगरसेवक निवडून आला नसल्यामुळे पदाधिका-यांना मान खाली घालण्याची वेळ आली. देशभरात कुठेच काँग्रेसची सत्ता नसल्यामुळे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मरगळ आली होती.

मध्यप्रदेश, राजस्तान, छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी काँग्रेसला कौल दिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे. एरव्ही, पुण्यात काँग्रेस कार्यालयासमोर झेंडा लावयलाही कार्यकर्ता समोर येत नसताना आज मात्र, झेंडे लावून आनंदोत्सव साजरा करताना शेकडो कार्यकर्ते दिसत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही उर्जीतावस्ता मिळाल्याने त्यांच्यामध्ये चैतन्य संचारले आहे. आज दुपारी चारच्या सुमारास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button