breaking-newsराष्ट्रिय

चौकीदार सतर्क, म्हणून लोक सुरक्षित – मोदी

तेलंगणाच्या लोकांनी नवभारतासाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथील सभेत केले असून चौकीदार सतर्क असल्यानेच देशातील लोक निर्भयपणे वावरू शकत आहेत, असा दावा केला.

येथील प्रचंड जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना सांगितले, की राव यांना गेल्यावर्षी मोठा विजय मिळूनही त्यांनी मंत्रिमंडळ स्थापनेत दिरंगाई केली होती. कदाचित ज्योतिषाने त्यांना मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यास सांगितले असावे. राव हे घराणेशाही व तुष्टीकरणाच्या राजकारणाचे प्रतीक असून विरोधकांनी अनेकदा हल्ले व शिवीगाळ करूनही मी लोकांच्या आशीर्वादाने विकासाच्या मार्गावर देशाला पुढे नेले. तुमच्या आशीर्वादानेच मी दडपणे सहन करू शकलो. त्यामुळेच आमचे सरकार निर्णयकारी ठरले. एनडीए सरकारने गेल्या पाच वर्षांत महिलांची सुरक्षा व शेतक ऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नागरी सुविधांपासून अवकाशापर्यंत आपले कार्यक्षेत्र रुंदावलेले होते. मोदी यांचा रोख उपग्रहविरोधी ए सॅट क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीच्या मिशन शक्तीकडे होता. ११ एप्रिलला तुम्ही केवळ खासदार निवडणार नाही तर देशाचा पंतप्रधानही निवडणार आहात. त्याचबरोबर हे मतदान नवभारतासाठी असेल. त्यात तेलंगणाच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित होतील. आता बॉम्बस्फोट व हल्ले काश्मीरमधील काही भागापुरचे मर्यादित असून देश हिंसाचारमुक्त व सुरक्षित झाला आहे. देशाच्या इतर भागात दहशतवादी हल्ले झालेले नाहीत, असे मोदी यांनी सांगितले.

रेल्वेतील कपांवर ‘मैं भी चौकीदार’ घोषणा!

रेल्वेतील प्रवाशांना ज्या पेपर कपातून चहा दिला जात आहे त्यावर ‘मैं भी चौकीदार’ अशी भाजपची घोषणा छापण्यात आल्याचे निदर्शनास आले असून हा आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगण्यात आले. काठगोगाम शताब्दी गाडीतील प्रवाशाने या कपचे छायाचित्र ट्विट केले असून त्या कपवर मैं भी चौकीदार असे छापलेले होते. रेल्वेने यावर असे म्हटले आहे की, हे कप मागे घेण्यात आले असून कंत्राटदाराला एक लाखाचा दंड करण्यात आला आहे. या कपांमधून दोनदा चहा दिला जात होता व त्यावर संकल्प फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने ही जाहिरात केली होती. रेल्वेच्या तिकिटांवर पंतप्रधान मोदी यांची चित्रे छापण्याचा प्रकार घडल्यानंतर लगेचच हा प्रकार निदर्शनास आला असून रेल्वेने आधीच्या प्रकारातही ही कृती सहेतूक नव्हती व चुकून हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचे म्हटले होते. आता मैं भी चौकीदार जाहिराती असलेल्या कपातून चहा देण्यात आल्याची बाब सामोरी आली असून त्याची चौकशी सुरू आहे. यात आयआरसीटीसीची परवानगी घेण्यात आली नव्हती. देखरेख अधिकारी व  खानपान सूत्रधार यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button