आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ३१ जानेवारीपर्यंत बदंच, केंद्र सरकारकचा निर्णय
नवी दिल्ली – कोरोनाच्या नव्या संक्रमनामुळे भारत सरकराने आंतरराष्ट्रीय विमानांवर पुन्हा एकदा बंदी घातली आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊलं ठेवलं आहे. भारतात जवळपास २० कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीने ब्रिटनमधून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.